Navi App वरून मिळवा 20,000 रुपयांचे Online Personal Loan | Navi App Online Personal Loan

नमस्कार, सदर लेखांमध्ये आपण Navi App 20,000 Online Personal Loan कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला कमी रक्कमेची अत्यंत गरज आहे तर तुम्ही Navi App वरून सदर कर्ज घेऊ शकता. याविषयीची माहिती म्हणजे सदर ॲपवरून हे लोन घेण्यासाठीची पात्रता काय आहे? तसेच या लोनचा व्याजदर व परतफेडीचा कालावधी किती आहे? हे कर्ज घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते? त्याचबरोबर सर्वात शेवटी या कर्जासाठी अर्ज कसा करायचा? ही माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.

Navi App हे एक असे लोन एप्लीकेशन आहे ज्याच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती घरबसल्या पर्सनल लोन ऑनलाईन  अर्ज करून अगदी कमी वेळेत घेऊ शकते. Navi App चे मूळ नाव Navi finserv private Limited असे असून ही एक नॉन बँकिंग वित्तीय संस्थेद्वारे नोंदणीकृत आहे. त्याचबरोबर याला आरबीआयची सुद्धा मान्यता मिळालेली आहे.Navi App द्वारे पर्सनल लोन बरोबरच होम लोन ही दिले जाते.Navi App ची लोन प्रक्रिया 100% डिजिटल पद्धतीने होते. त्याचबरोबर लोन ची रक्कम अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये तात्काळ ट्रान्सफर केली जाते.

Navi App Online Personal Loan चा व्याजदर 9.9% ते 45 टक्के प्रति वर्ष इतका असू शकतो. अंतिम व्याजदर हा अर्जदाराचे वय, मासिक उत्पन्न, जॉब प्रोफाइल, क्रेडिट स्कोर, कर्ज परतफेड करण्याची रेकॉर्ड इत्यादीवर अवलंबून असतो.Navi App Online Personal Loan परतफेडीचा कालावधी हा तीन ते 72 महिन्यापर्यंत असतो. Navi App Online Personal Loan साठी प्रोसेसिंग फी नाममात्र आहे.

हे वाचा-  अर्ज करा आणि 40,000 रुपये बँक खात्यात मिळवा आत्ताच Apply करा| Low CIBIL 40,000 Personal Loan Apply Online

Navi App द्वारे होम लोन 5 कोटी पर्यंत दिले जाते. होम लोन चा व्याजदर 8.75 टक्के प्रतिवर्षपासून आकारला जातो. तसेच होम लोन कर्जाचा कालावधी हा 30 वर्षापर्यंत असू शकतो. या कर्जासाठी प्रोसेसिंग फी ही शून्य आहे. तसेच या कर्जासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे.

Navi App मार्फत ऑनलाईन पर्सनल लोन घेण्यासाठी अर्जदाराला काही अटी व शर्तीमध्ये पात्र होणे आवश्यक असते. त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते आपण खाली सविस्तरपणे पाहूया:

  • Navi App Online Personal Loan साठी पात्र होण्यासाठी अर्जदार व्यक्ती ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सदर व्यक्तीची वयोमर्यादा 21 ते 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • Navi App Online Personal Loan साठी पॅन कार्ड धारक, पगारदार व्यक्ती किंवा नोकरदार व्यक्ती त्याचबरोबर स्वयंरोजगार व्यक्ती पात्र आहेत.
  • सदर कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15,000 रुपये असणे आवश्यक आहे.
  • Navi app online personal loan साठी पात्र होण्यासाठी अर्जदार व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. ही पात्रता खूप महत्त्वाची आहे.

Navi App Online Personal Loan साठी अर्ज करताना अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. Navi App वरून पर्सनल लोन घेण्यासाठी अत्यंत कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते आपण खाली पाहूया:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • अर्जदाराचा सेल्फी स्वरूपातील फोटो
  • बँक डिटेल्स

Navi App Online Personal Loan साठी अर्जदाराने अर्ज कशा पद्धतीने करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • Navi App वरून वैयक्तिक कर्ज किंवा पर्सनल लोन घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store वरून Navi App डाउनलोड करणे आवश्यक आहे. ???????????????????????? https://play.google.com/store/apps/details?id=com.naviapp
  • त्यानंतर तुम्हाला या ॲपवरून ‘वैयक्तिक कर्ज’ असे लिहिलेली दिसेल. त्याखाली दिलेल्या Apply Now या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे किंवा लॉगिन ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व खाली दिलेल्या Get OTP या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो OTP दिलेल्या जागी टाकून Verify करून घ्यायचा आहे.
  • त्यानंतर नवीन पेजवर Get Started या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, त्यानंतर ही ॲप तुम्हाला काही परमिशन्स मागेल त्या Allow करायच्या आहेत.
  • जर तुम्ही सदर कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला हवी असलेली कर्ज रक्कम आणि ईएमआय रक्कम निवडा.
  • त्यानंतर तुमच्या सोबत पुन्हा एकदा नवीन पेज ओपन होईल त्यावर काही प्राथमिक माहिती टाकायची आहे. जसे की तुमचे नाव, जन्मतारीख, तुमचा पॅन कार्ड नंबर इ. त्यानंतर next बटन वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुम्हाला Work Details etails मध्ये तुमचे Employment Type निवडायचे आहे. त्याखाली तुमचे Monthly Income टाकायचे आहे व शेवटी Next बटनवर क्लिक करायचे आहे.
  • पुन्हा एकदा हे ॲप परत काही परमिशन्स मागेल त्या ॲग्री करायच्या आहेत.
  • त्यानंतर परत एकदा तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो दिलेल्या जागी टाकून verify करून घ्यायचा आहे.
  • आता तुम्हाला तुमचे Bank details द्यायचे आहेत. यात तुम्हाला तुमचे बँक खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे नाव टाकायचे आहेत. इथे तुमचे बँक अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी नेट बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग असणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमचे बँक अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी नेट बँकिंग साठीचे युजरनेम व पासवर्ड टाकून व्हेरिफाय करून घ्यायचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो टाकून बँक खाते व्हेरिफाय करून घ्यायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर पुन्हा एकदा नवीन पेज ओपन होईल यामध्ये तुमचे Loan Details दिसतील. यामध्ये तुम्हाला किती लोन अमाऊंट मिळू शकते व त्याचा कालावधी त्याचबरोबर दिसेल. इथे तुम्ही ईएमआय प्लॅन निवडू शकता.
हे वाचा-  phone pe personal loan| फक्त दहा मिनिटात, phonepe वरून आता 1 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन मिळवा

अशा पद्धतीने अर्ज करून तुम्ही Navi App Online Personal Loan घेऊ शकता.

सदर लेखांमध्ये आपण Navi App 20,000 Online Personal Loan कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या आवश्यक गरजांसाठी सदरचे कर्ज वरील प्रक्रियेच्या साह्याने प्राप्त करू शकता. धन्यवाद!

Leave a Comment